मुख्याध्यापक संघाचे गुणवंत पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्याध्यापक संघाचे गुणवंत पुरस्कार जाहीर
मुख्याध्यापक संघाचे गुणवंत पुरस्कार जाहीर

मुख्याध्यापक संघाचे गुणवंत पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

पिरंगुट, ता. १७ : पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे जिल्हा गुणवंत पुरस्कार जाहीर केल्याची माहिती संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर व सचिव प्रसाद गायकवाड यांनी दिली.
पुणे येथील पद्मावती भागातील अण्णा भाऊ साठे सभागृहात शनिवारी (ता. २४) सकाळी साडेदहा वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी भाषणकला प्रशिक्षक शशांक मोहिते हे ‘अध्यापनात संवाद कौशल्याचा प्रभावी वापर’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

तालुकानिहाय अनुक्रमे मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे- आंबेगाव- सुनंदा मोरे (निरगुडसर), शिवाजी आहेर (पेठ), अलका चासकर (चिंचोली कोकणे), नंदराम येवले (गंगापूर बुद्रुक). बारामती- विमल बनकर (श्रीरामनगर-जळोची), मुसा नबाब (बारामती), युवराज साळुंके (काटेवाडी), राजू मदने (मुढाळे). भोर- बाळासाहेब वाघ (भोर), रमेश टकले (हातवे), विश्वास निकम (भोर), रेहाना लतिफ (कारी). वेल्हे- संतोष चव्हाण (पानशेत), धनंजय जाधव (निवी), संगीता वाल्हेकर (आंबवणे), मारुती पानसरे (विंझर). दौंड- प्रमिला डोंगरे (केडगाव), दुर्योधन जठार (बेटवाडी), रामदास होले (दौंड), गजानन वाघमारे (कुरकुंभ).
हवेली- विष्णू गुरव (मांगडेवाडी), संदीप लोणकर (वाघोली), रमेश विचारे (शिंदवणे), रेश्मा यादव (खानापूर), श्रीकांत बलकवडे (तुळापुर). इंदापूर- जगन्नाथ पाटील (रूई), बबन शिंदे (जंक्शन), अरुणा कवडे (अवसरी), अशोक पानसरे (घोलपवाडी). जुन्नर- स्नेहल आवटे (धामणखेल), निवृत्ती आहेर (खामुंडी), वनिता भोर (डिंगोरे), विकास दांगट (हिवरे खुर्द). खेड- शिवाजीराव दुंडे (वाडा), शांताराम जगताप (वाकी खुर्द), सरिता घोरपडे (आंबोली), सुहास पेठकर (खराबवाडी). पुरंदर- चांगदेव म्हस्के (चांबळी), बाबूराव गायकवाड (जवळार्जुन) , सारिका सातव (पारगाव मेमाणे), दत्तात्रेय शिर्के (मांढर), मावळ- प्रकाश शिंदे (तळेगाव दाभाडे), आनंदराव जाभुंळकर (टाकवे बुद्रुक), सुनील झेंडे (कामशेत), सायली आपटे (लोणावळा). मुळशी- दत्तात्रेय चाळक (भांबर्डे), संजय शितोळे (नेरे), मंदा बोराडे (आसदे ), संजय सुवासे (महाळुंगे पाडाळे). शिरूर- तुकाराम वाघमारे (कारेगाव), सोमनाथ भंडारे (वढू बुद्रुक), अनिता घोडके (मांडवगण फराटा), गजानन गोंजारी (सरदवाडी).

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00737 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..