भूगावला दुर्गा पूजा, नवरात्रोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूगावला दुर्गा पूजा, नवरात्रोत्सव
भूगावला दुर्गा पूजा, नवरात्रोत्सव

भूगावला दुर्गा पूजा, नवरात्रोत्सव

sakal_logo
By

पिरंगुट, ता. २० : भुकूम (ता. मुळशी) येथील स्टार टाऊन व परिसरातील रहिवासी यांनी दुर्गा पूजा आणि नवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. ‘वाईटावर चांगल्याचा विजय’ या संकल्पनेतून हा उत्सव मुळशी तालुक्यात पहिल्यांदाच साजरा केला जात आहे. भूगावमधील मानसलेक जवळील राजलक्ष्मी लॉनमध्ये हा उत्सव शनिवार दिनांक १ ऑक्टोबर ते बुधवार दिनांक ५ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रमांनी साजरा होईल. रोज सकाळी देवीची पूजा, पुष्पांजली व प्रसाद वितरण तसेच, सायंकाळी देवीची आरती, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शंख नाद, धुनुची नृत्य आणि रास गरबा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सर्व भाविकांसाठी हा उत्सव खुला असून या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक दुर्गा पूजा कमिटी, भूगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी भाविकांनी ८९७०६६०४७७, ९८९३६७८७८७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00738 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..