समस्या न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समस्या न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा
समस्या न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा

समस्या न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा

sakal_logo
By

पिरंगुट, ता. ३ : भुकूम (ता.मुळशी) येथील परिसरातील विविध समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन हगवणे तसेच माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सचिन आंग्रे यांनी थेट आमदार संग्राम थोपटे यांनाच साकडे घातले आहे. या समस्या सुटल्या नाही आंदोलनाचा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला.
वीज, रस्ते, पाणी, वाहतूक कोंडी आदी समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली. दरम्यान, आमदार संग्राम थोपटे यांनी या समस्यांवर उपाययोजना सुरू करण्याचे आश्वासनही दिले आहे. मुळशी टप्पा क्रमांक दोनमधील प्रतिमाणसी पंचावन्न लिटर पाणी ऐवजी ते नव्वद लिटर प्रति माणसी मिळावे, वाढती लोकसंख्या विचार घेऊन भूगाव व भुकूमकरिता वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी व पुरेसा मिळण्यासाठी स्वतंत्र सबस्टेशन मिळावे, वाढते शहरीकरण व पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे मुळशीत वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढलेली असल्याने भूगाव गावठाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे भूगाव याठिकाणी पुणे कोलाड या रस्त्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून बाह्यवळण मार्ग लवकरात लवकर व्हावा, आदी मागण्या थोपटे यांच्याकडे करण्यात आल्या.

समस्यांबाबत सचिन आंग्रे म्हणाले की भरे येथून मुळशीतील सर्व गावांना वीज पुरवठा केला जातो. नैसर्गिक आपत्तीवेळी भरे परिसरात वीजपुरवठा खंडित झाला तर त्याचा फटका मुळशीतील अन्य भागाला बसतो. मुळशीत चार विभागात सबस्टेशन उभारली तर वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल. लवळे, भुकूम तसेच भूगावला बिल्डर मंडळी सबस्टेशनसाठी जागा द्यायला तयार आहेत. त्यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे. त्यामुळे सबस्टेशनसाठी तातडीने पावले उचलावीत. भूगावला गावठाणातून जाणार महामार्ग अरुंद असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे या ठिकाणी बाह्यवळण मार्गासाठी तातडीने कार्यवाही झाली तर वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल. भूगाव व भुकूम ही दोन गावे पुणे शहरालगत आल्याने नागरिकरणात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे.