पिरंगुटला शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिरंगुटला शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा
पिरंगुटला शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

पिरंगुटला शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

sakal_logo
By

पिरंगुट, ता. २१ : जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा मुख्याध्यापक संघ व तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने पिरंगुट (ता. मुळशी) येथील इंग्लिश स्कूल विद्यालयात इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शनासाठी कार्यशाळा पार पडली. उद्‍घाटन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गोरक्षनाथ हिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिरंगुट विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव शिंदे होते.
या वेळी हिंगणे म्हणाले, ‘‘तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसावे. इयत्ता दहावी व बारावीच्या उज्ज्वल निकालासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न केले जातात. तसेच प्रयत्न शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लावण्यासाठी करावेत.’’ मुख्याध्यापक संघाचे विद्यासचिव जी. व्ही. पाबळे व डी. एच. शिंदे यांची भाषण झाली. जे. के. सैद, डी. ए. चेडे, ए. एन. पटेकर यांनी मार्गदर्शक केले. रियाज शेख व सुजाता फरांदे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन तालुका मुख्याध्यापक संघाचे विद्यासहसचिव एन. बी. खेडेकर यांनी केले. तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव विठ्ठल कुंभार यांनी प्रास्ताविक केले. तर, आभार तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष सतीश शिंदे यांनी मानले.