‘भूपाळी ते भैरवी’ने पिरंगुटकर मंत्रमुग्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘भूपाळी ते भैरवी’ने पिरंगुटकर मंत्रमुग्ध
‘भूपाळी ते भैरवी’ने पिरंगुटकर मंत्रमुग्ध

‘भूपाळी ते भैरवी’ने पिरंगुटकर मंत्रमुग्ध

sakal_logo
By

पिरंगुट, ता. २९ : पिरंगुट (ता. मुळशी) येथील तुळजा भवानी मंदिरात ऋतिकादिदी कदम व त्यांच्या भावंडांनी गायलेल्या सुमधुर गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. दिवाळी पहाटच्या निमित्ताने येथील जय तुळजा भवानी ट्रस्ट व हिंदवी महिला प्रतिष्ठानच्यावतीने झीटीव्ही फेम ऋतिकादिदी कदम यांच्या ''प्रभाती सूर नभी रंगती'' या कार्यक्रमांतर्गत ''भूपाळी ते भैरवी'' या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन पिरंगुटच्या माजी सरपंच ललिता पवळे व माजी उपसरपंच राहुल पवळे यांनी केले होते.
पहाटे येथील मंदिरात हजारो दिव्यांची रोषणाई करून आरास करण्यात आली होती. त्यानंतर प्रसन्न वातावरणात ऋतिकाच्या ओंकार प्रधान रुप गणेशाचे या अभंगाने मैफलीला सुरवात झाली. त्यानंतर मन लागो रे लागो, पंढरीचे भूत मोठे, प्रभाती सूर नभी रंगती, दिवस तुझे हे फुलायचे, ऐरणीच्या देवा तुला, एकाच या जन्मी जणू , काली काली अलको से, प्रेमवेडी राधा आदी गीतांनी मैफिलीत चढत्या क्रमाने रंगत आणली. भावगीते, वासुदेव गीत आदींच्या सादरीकरणानंतर ओंकार कदम याने सादर केलेल्या लखाबाय, पोतराज आला भेटीला या गाण्याने वन्समोअर घेतला. लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा या गाण्यानंतर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाची सांगता ज्योत से ज्योत जलाते चलो.... या गीताने करण्यात आली. तबलासाथ प्रमोद भालेराव यांनी केली. विशाल कणसे, अनिल सावळे, शिवाजी कदम यांनीही विविध वाद्यांवर उत्तम साथ केली.