अमृतेश्वर सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत मोहोळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमृतेश्वर सोसायटीच्या
अध्यक्षपदी चंद्रकांत मोहोळ
अमृतेश्वर सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत मोहोळ

अमृतेश्वर सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत मोहोळ

sakal_logo
By

पिरंगुट, ता. ९ : मुठा (ता. मुळशी) येथील अमृतेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत नामदेव मोहोळ; तर उपाध्यक्षपदी माळेगाव येथील संतोष नथू चौधरी यांची बिनविरोध निवड झाली.

या सोसायटीचे अध्यक्ष गोपाळ वर्पे व उपाध्यक्ष श्रीहरी कुडले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागांवर मोहोळ व चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी महादेव कोंढरे, संग्राम मोहोळ, रामदास मानकर, गोपाळ वर्पे, श्रीहरी कुडले, तानाजी मरगळे, रमेश पवार, सुरेश गुरव, बापू भालेराव, सुमन मोहोळ, संगीता वाशिवले आदी सभासद उपस्थित होते. बिनविरोध निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संग्राम मोहोळ तसेच सभासदांनी प्रयत्न केले.
संस्थेचे सचिव मल्हारी मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थेच्या कार्यक्षेत्रात मुठा, माळेगाव, जातेडे, कोंढूर, डावजे तसेच कातवडी आदी गावांचा समावेश आहे. संस्थेचे सभासद भागभांडवल एकाहत्तर लाख रुपये असून यावर्षी तीन कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेला ऑडिट ‘ब’ वर्ग मिळालेला आहे.