शेलारवाडीतील विठ्ठल मंदिरातील मूर्तींचा वर्धापनदिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेलारवाडीतील विठ्ठल मंदिरातील मूर्तींचा वर्धापनदिन उत्साहात
शेलारवाडीतील विठ्ठल मंदिरातील मूर्तींचा वर्धापनदिन उत्साहात

शेलारवाडीतील विठ्ठल मंदिरातील मूर्तींचा वर्धापनदिन उत्साहात

sakal_logo
By

पिरंगुट, ता. २३ : उरवडे (ता. मुळशी) येथील शेलारवाडीतील तरुणाईच्या एकोप्याचे प्रतीक बनलेल्या विठ्ठल मंदिरातील मूर्तींचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तरुणांनी जुन्या हेव्यादाव्यांना मूठमाती देऊन काळानुसार सामाजिक बांधिलकी जोपासून सार्वजनिक विकासाला चालना देणाऱ्या आणि प्रगतीला पोषक ठरणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. त्याचाच भाग म्हणून ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून मिळालेल्या मानधनातून त्यांनी विठ्ठल मंदिर उभारले आहे. या मंदिरात विठ्ठल रुक्मिणी व मारुती आदी मूर्तींची प्रतिष्ठापणा करण्यात आली असून भक्ती शक्तीचा संगम असलेल्या या मूर्तींच्या प्रतिष्ठापनेचा वर्धापनदिन धार्मिक विधींनी साजरा करण्यात आला.
यापूर्वी या ठिकाणी एकही सार्वजनिक मंदिर नव्हते. त्यामुळे मंदिर नसलेली वाडी अशी या वाडीची खंत होती. गेली कित्येक वर्ष मंदिर नसलेली ही वाडी ओळखली जायची. या वाडीमध्ये शंभर वर्ष जुनी तालीम होती त्या जागेवर पंचवीस वर्षांपूर्वी विकास निधीतून सुरवातीला सभागृह बांधले. त्याच सभागृहाला मंदिराचे रूप देऊन सुंदर असे मंदिर उभारले आहे. सर्व तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी ढोल ताशा पथकाच्या मानधनातून व ग्रामस्थांची लोकवर्गणी, समाजातील काही दानशूर व्यक्तींनी या मंदिरासाठी योगदान दिले. वर्धापनदिनानिमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली. भजन दिंडीच्या माध्यमातून प्रदक्षिणा घालण्यात आली. वनिता पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.