‘पुणे टॅलेंट सर्च एक्झाम’मध्ये २३ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पुणे टॅलेंट सर्च एक्झाम’मध्ये २३ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
‘पुणे टॅलेंट सर्च एक्झाम’मध्ये २३ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

‘पुणे टॅलेंट सर्च एक्झाम’मध्ये २३ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

sakal_logo
By

पिरंगुट, ता. २४ : राष्ट्रीय गणित दिनानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘पुणे टॅलेंट सर्च एक्झाम’मध्ये जिल्ह्यातील ३३७ विद्यालयांतील २३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय गणित दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व पुणे जिल्हा गणित विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील मराठी व सेमी माध्यमाच्या शाळांतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतल्याची माहिती जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर यांनी दिली. ही परीक्षा एकाच दिवशी गुरुवारी (ता. २२) सकाळी अकरा वाजता पार पडली. या परीक्षेचे आयोजन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, सचिव प्रसाद गायकवाड, गणित-विज्ञान अध्यापक संघटनेचे कल्याण कडेकर, भारत काळे, डी. एच. शिंदे, सचिन घनवट, रोहिदास एकाड, तवाजी वाघदरे, भानुदास रिठे आदींनी केले होते.