मुळशीतील शिक्षकांचे समस्यांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळशीतील शिक्षकांचे समस्यांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
मुळशीतील शिक्षकांचे समस्यांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

मुळशीतील शिक्षकांचे समस्यांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

sakal_logo
By

पिरंगुट, ता. २८ : मुळशी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाने गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्या सोडविण्याची मागणी केली आहे.
तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शहाजी मारणे यांच्या नेतृत्वाखाली गटशिक्षणाधिकारी गोरक्षनाथ हिंगणे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. सर्व शिक्षक गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यास कटिबद्ध आहेत. पण शिक्षकांची प्रलंबित कामे मार्गी लावावीत, अशी ठाम भूमिका शिक्षक संघाने घेतली आहे. शिक्षकांच्या अर्जित रजांची मंजुरी, सेवा पुस्तके अद्ययावत करणे, वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव, एनपीएसचे प्रस्ताव, सर्व प्रकारची बिले मंजूर करणे, शालेय पोषण आहार, मानधन लवकरात लवकर जमा करणे, गेल्या दोन वर्षापासून रखडलेला गुणवंत शिक्षक पुरस्कार कार्यक्रम आदी कामे वेळेत होण्याबाबत निवेदन दिले. या वेळी अर्जित रजा नोंद, सेवा पुस्तके अद्ययावत करणे आदी कामे दोन दिवसात पूर्ण करणार असल्याचे हिंगणे यांनी सांगितले. सरचिटणीस संतोष गावडे यांनी आभार मानले. याप्रसंगी शिवाजी चवले, अविनाश टेमगिरे, रियाज शेख, रवींद्र चौधरी, संजय मारणे, सलीम तांबोळी व जालिंदर चौधरी उपस्थित होते.