
माळेगावच्या सरपंचपदी नंदा चौधरी विजयी
पिरंगुट, ता. ३० : माळेगाव (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नंदा नामदेव चौधरी विजयी झाल्या.
माळेगाव ग्रामपंचायतीची एकूण सदस्यसंख्या सात असून, सदस्यपदाच्या निवडणुकीत दोन जागा रिक्त राहिलेल्या आहेत. पाच सदस्यांच्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत किसन सुदाम भोसले, पल्लवी रमेश डाळ, मंगल ज्ञानोबा गुंड, रवींद्र दत्तोबा कडू व छाया विठ्ठल वाशिवले यांनी बाजी मारली. प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री व प्रभाग क्रमांक तीनमधील अनुसूचित जमाती या दोन जागा रिक्त राहिलेल्या आहेत.
निवडीनंतर नंदा चौधरी व सदस्यांची मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. यावेळी बाळकृष्ण मारणे, श्रीपती गुंड, दत्तोबा कडू, पांडुरंग वाशिवले, लहू चौधरी, सुखदेव चौधरी, बंडामामा चोरघे, चंद्रकांत मरगळे, खंडेराव मारणे, शिवाजी गुंड, बबन खापरे, तुकाराम मारणे, सुनील मारणे, अंकुश मारणे, बबन कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.