संभाजीराजांचे स्मारक उभारण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजीराजांचे स्मारक
उभारण्याची मागणी
संभाजीराजांचे स्मारक उभारण्याची मागणी

संभाजीराजांचे स्मारक उभारण्याची मागणी

sakal_logo
By

पिरंगुट, ता.१६ : घोटावडे फाटा (ता. मुळशी) येथील चौकाला धर्मवीर संभाजी राजे चौक असे नाव देऊन त्याठिकाणी संभाजी महाराजांचे स्मारक उभारावे, अशी मागणी मुळशी तालुका भाजप युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मारणे यांनी विविध विभागांना तसेच लोकप्रतिनिधींना दिले आहे. याबाबत मारणे म्हणाले, या चौकाला धर्मवीर संभाजीराजे चौक म्हणायला प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी, अशी मोहीम हाती घेतली आहे. धर्मवीर संभाजीराजे यांच्या ३४२ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संभाजी राजे यांनी हिंदवी स्वराज्यासाठी केलेला त्याग, पराक्रम, शौर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक म्हणून या चौकाला धर्मवीर संभाजीराजे चौक असे नाव देऊन त्यांचे स्मारक उभारल्यास मुळशीकरांच्या ऐतिहासिक संपन्नतेत वाढ होईल. त्यासाठी नामकरणाची ही मोहीम घरोघरी राबविणार आहोत.