खाटपेवाडीला मिळणार ४० वर्षांनंतर स्मशानभूमी

खाटपेवाडीला मिळणार ४० वर्षांनंतर स्मशानभूमी

पिरंगुट, ता. ५ : भुकूम (ता.मुळशी) येथील खाटपेवाडीचा गेल्या चाळीस वर्षांचा स्मशानभूमीचा प्रश्न ग्रामपंचायतीने नुकताच मार्गी लावल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. त्यासाठी गेली दोन वर्षे ग्रामपंचायतीकडून सातत्याने महसूल विभागाशी पत्रव्यवहार सुरू ठेवून पाठपुरावा केला होता.

मावळ मुळशीचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी भुकूम, खाटपेवाडी येथील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेऊन येथील स्मशानभूमीचा सातबारा त्यांच्याकडे सुपूर्त केला. खाटपेवाडी ही भुकूम गावामधून चार किलोमीटर अंतरावर वसलेली वाडी आहे. या वाडीमधील रहिवाशांच्या निधनांतर त्यांच्या अंत्यविधीसाठी भुकूम येथील गावठाणामध्ये अंत्ययात्रा काढावी लागत असे. सुमारे चार किलोमीटरची पायपीट करून अंत्ययात्रा काढावी लागत असे. त्यामुळे स्थानिक परिसरातच ही स्मशानभूमी असावी, अशी खाटपेवाडीतील ग्रामस्थांनी अनेक वर्षांची मागणी होती. त्यासाठी विविध स्तरावर त्यांना संघर्ष करावा लागला.

लघुपाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतीच्या नावावर दहा गुंठे जागा केली असून त्याचे बांधकामही लवकरच करणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, मावळ मुळशीचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार अभय चव्हाण, स्थानिक शेतकरी दशरथ कुडले यांनी विशेष सहकार्य केले, अशी माहिती ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी प्रसाद भरतवंश, उपसरपंच अंकुश प्रकाश खाटपे, माजी उपसरपंच सचिन पोपटराव आंग्रे, सचिन बाळासाहेब हगवणे यांनी दिली. ग्रामपंचायत सदस्य नीलेश जयसिंगराव ननावरे, सुवर्णा सुभाष पानसरे, मयूरी अभिलाष आमले, माजी सरपंच सुवर्णा रामदास आंग्रे, माजी सरपंच रेखा योगेश वाघ, ग्रामसेवक भागवत यादव या सर्वांनी ग्रामस्थांच्या पाठिंब्यामुळे ही जागा मिळाली असल्याचे सांगितले.


01763

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com