
मुळशी तालुक्यात कांद्यावर करपा रोग
पिरंगुट, ता. २४ : मुळशी तालुक्यातील हवामानाध्ये बदल झाल्यामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव वाढला आहे. तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील पिरंगुट, लवळे, नांदे, चांदे, मुलखेड, घोटावडे, भरे आदी परिसरात विषम हवामान निर्माण होत आहे.
मागील पंधरा दिवसांमध्ये सकाळच्या धुक्यामुळे पिकावर दव साचत आहे. तर दुपारी कडक उन्हाच्या झळांमुळे कांद्यावर करपा रोग वाढला आहे. तापमान वाढीमुळे मावा रोगावर नियंत्रण करणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. करपा रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी परिसरात सध्या औषध फवारणीची कामे चालू आहेत.
सध्याच्या उष्ण व दमट हवामानामुळे पिकावर पिवळा मावा व रस शोषणारे टकांचा प्रादूर्भाव सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक आठवड्याने फवारणी करावी लागते आहे. कांदा पिकाची पात करपून वाकडी झाली आहे. त्यात भर म्हणून तापमानवाढीमुळे मावासारख्या रोगावर नियंत्रण करणे अवघड होत आहे.
- प्रमोद राऊत, शेतकरी