चांदे येथील बंद घरातून २० लाखांचा ऐवज चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदे येथील बंद घरातून
२० लाखांचा ऐवज चोरी
चांदे येथील बंद घरातून २० लाखांचा ऐवज चोरी

चांदे येथील बंद घरातून २० लाखांचा ऐवज चोरी

sakal_logo
By

पिरंगुट, ता. १२ : चांदे (ता. मुळशी) येथील बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी १९ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी काळुराम बाळू मांडेकर (वय २९, व्यवसाय- बांधकाम व्यावसायिक, रा. घरकुल वस्ती, चांदे) यांनी फिर्याद दिली. त्यांचे चांदे येथील घरकुल वस्ती येथे घर आहे. शुक्रवारी (ता. १०) रात्रीच्या सुमारास चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या मागील दरवाजाचे सेफ्टी डोअरच्या दरवाजाची कडी उघडून घरातील प्लायवूडच्या दरवाजास ठोकर देऊन घरात प्रवेश केला. तसेच, घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा एकूण १९ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यामध्ये साडे सहा लाख रुपये किमतीची सोन्याची चैन, दोन लाख रुपये किमतीचा गळ्यातील सोन्याचा चॉफर, एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व रोख दहा लाख रुपयांचा समावेश आहे. वरिष्ठ निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी घटनास्थळी पाहणी केली.