पिरंगुट, ता. २१ : मुळशी तालुक्यातील मुठा ते लवार्डे या आठ किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट असल्याने त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी मुळशी भाजप युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी केली आहे.
दुरुस्तीबाबत मारणे यांनी सांगितले की, एका वर्षात लवार्डे ते मुठा रस्त्याचे खड्डे बुजविण्यासाठी पन्नास लाख रुपये खर्च केले आहेत. मुठा खोऱ्यात ३ कोटी ९२ लाख रुपये खर्च करून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. हे काम साधारण एक वर्षांपूर्वी चालू करण्यात आले. एवढ्या मोठ्या रकमेपैकी पन्नास लाख रुपये आठ किलोमीटरचे खड्डे बुजविण्यासाठी खर्च केले गेले. रस्ता दुरुस्तीला निधी नसल्यामुळे संबंधित ठेकेदाराने काम थांबविले होते. नंतर विकास निधीची तरतूद झाल्याने काम पुन्हा सुरू झाले. मूळात सध्या जे काम चालू आहे तेही निकृष्ट दर्जाचे आहे. याबाबत अजय भोसले, हेमंत पाटील तसेच मधुकर भिंगारदिवे आदी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे कामासंदर्भात तक्रार करूनही त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे उच्च स्तरावर या कामाबाबत चौकशी व्हावी.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करूनही तो होऊ शकला नाही.
01985
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.