भूगावात जनसेवा महा-ई-सेवा केंद्र सुरू

भूगावात जनसेवा महा-ई-सेवा केंद्र सुरू

पिरंगुट, ता. १७ : भूगाव (ता.मुळशी) येथील तरुणांनी एकत्र येऊन जनसेवा महा-ई-सेवा केंद्र सुरू केले आहे. त्याच्या माध्यमातून मोफत शासकीय दाखले व कागदपत्रे उपलब्ध होणार आहेत.
भूगाव येथील माजी उपसरपंच व जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अक्षय बाळासाहेब सातपुते आणि अजय सुभाष सातपुते यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाबाबत माहिती देताना अक्षय सातपुते यांनी सांगितले की, ''सरकारी काम नि बारा महिने थांब''. ही केवळ म्हण नाही तर शासकीय कामासाठी प्रत्येकाला आलेला भयंकर अनुभव आहे. ज्या शासकीय दाखल्यासाठी, प्रतिज्ञा पत्रासाठी ३० ते ४० रुपये इतका खर्च येतो त्यासाठी आपली हजारो रुपयांची लूट होते. त्याबरोबरच अर्वाच्य अरेरावीची भाषा ऐकून घेऊन त्यांच्या मनमानी वेळेनुसार आपल्याला दाखले मिळतात. तोपर्यंत आपण मात्र वणवण करत राहायचे. त्यामुळे लोकांच्या गरजेचे भांडवल करून पैसे कमावणे आता कुठेतरी थांबविले पाहिजे. म्हणूनच आम्ही जनसेवा महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला सर्व प्रकारचे शासकीय दाखले, प्रतिज्ञापत्रे, अन्य कागदपत्रे मोफत उपलब्ध करून देणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com