दिलीप यादव यांना सहकार विभागाचा दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिलीप यादव यांना सहकार विभागाचा दिलासा
दिलीप यादव यांना सहकार विभागाचा दिलासा

दिलीप यादव यांना सहकार विभागाचा दिलासा

sakal_logo
By

परिंचे, ता. ३० : पुरंदर तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप यादव यांना श्रीनाथकृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राहण्यास अपात्र करण्याच्या निर्णयाला राज्याच्या सहकार विभागाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे यादव यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला असून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या या आदेशाने दिलीप यादव यांना दिलासा मिळाला आहे.
परिंचे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायत हद्दीतील मिळकत क्रमांक ९७२ मधील सात व आठ नंबरच्या गाळे आहेत. ते दिलीप यादव यांचे मोठे बंधू शिवाजी सोपानराव यादव यांच्या मालकीचे आहेत. ते शासनाने आखून दिलेल्या मुल्यांकनापेक्षा जास्त किमतीने खरेदी करून संस्थेचे नुकसान केल्याची तक्रार बाळासाहेब सोपानराव यादव व नीलेश आनंदराव यादव यांनी दाखल केली होती. त्यावरून अतिरिक्त निबंधक डॉ. पी. एल. खंडागळे यांनी दिलीप यादव यांना पतसंस्थेचे अध्यक्षपद रद्द केले होते.
त्यानंतर राजकीय हस्तक्षेपातून आपले संचालकपद रद्द केल्याचा आरोप करून या आदेशाला यादव यांनी सहकारमंत्र्यांकडे आव्हान दिले होते. त्यानुसार सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान दोनही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर सहकारमंत्र्यांनी दिलीप यादव यांचा युक्तिवाद मान्य करत अतिरिक्त निबंधक यांनी कागदोपत्री पुरावे न तपासता व घाईघाईने हा बेकायदेशीर आदेश दिला असून, तक्रारदारांनी कुठलेही ठोस पुरावे सादर केलेले नाहीत, त्यामुळे दिलीप यादव यांचा युक्तिवाद योग्य व सयुक्तिक वाटतो, असे नमूद करत अतिरिक्त निबंधकाच्या आदेशाला स्थगिती दिली.

अधिकाऱ्यांवर दबाव आणून षड्यंत्र रचले होते. नातेवाईक म्हणून कुणाला संस्थेचा गैरफायदा घेऊ दिला जाणार नाही. कर्जबुडवा व्यक्ती नातेवाईक असला, तरी त्यांना मी दयामाया दाखवत नाही. अशा असंतुष्ट नातेवाइकांनीच हा नीचपणा चालवला होता. कायद्याने त्यांनाही वठणीवर आणले.
- दिलीप यादव

Web Title: Todays Latest District Marathi News Prn22b00809 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top