मांढर सोसायटीच्या अध्यक्षपदी तानाजी पापळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांढर सोसायटीच्या अध्यक्षपदी तानाजी पापळ
मांढर सोसायटीच्या अध्यक्षपदी तानाजी पापळ

मांढर सोसायटीच्या अध्यक्षपदी तानाजी पापळ

sakal_logo
By

परिंचे, ता. ५: मांढर (ता. पुरंदर) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी तानाजी दिगंबर पापळ व उपाध्यक्षपदी मंगल कोंडिबा शिर्के यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रमिला मदने यांनी ही घोषणा केली. यावेळी संस्थेचे सचिव भरत शिंदे, हुमाजी गिरमे उपस्थित होते. यावेळी स्वीकृत संचालक म्हणून सोपान मोहन साळुंखे, सत्यवान नारायण चव्हाण यांची निवड करण्यात आली
ग्रामस्थांच्यावतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुरंदर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष संतोष शिर्के, माजी सरपंच सचिन शिंदे, जयवंत मांढरे,विश्वास शिर्के, माजी उपसरपंच उत्तम पापळ, महादेव पापळ, दत्तात्रेय गाडे, भालचंद्र निगडे, बाजीराव पापळ, तानाजी शिर्के आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Prn22b00810 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top