पाटील विद्यालयात रंगला स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटील विद्यालयात रंगला स्नेहमेळावा
पाटील विद्यालयात रंगला स्नेहमेळावा

पाटील विद्यालयात रंगला स्नेहमेळावा

sakal_logo
By

परिंचे, ता.१० : येथील (ता.पुरंदर) कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात सन २००० मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन रंगला. यावेळी भावी पिढीला दर्जेदार शिक्षण घेता यावे म्हणून प्रयोग शाळेच्या केमिस्ट्री विभागाला एक लाख रुपये किमतीची गॅस पाइपलाइन व आवश्‍यक साहित्य देण्याची तयारी ५० माजी विद्यार्थ्यांनी दर्शविली आहे.
स्नेहमेळाव्यात भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रध्दांजलीही वाहण्यात आली. कार्यक्रमासाठी तत्कालीन शिक्षक पी. एस. जाधव, हनुमंत पवार, अप्पासाहेब ताकवले, गुलाब यादव, दादा बोराटे, सुरेश संकपाळ तसेच मुख्याध्यापक महेश गोरेगावकर, शिक्षकेतर कर्मचारी पोपट वाघोले, बाप्पू कुंभार यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्याबॅचमधील इयत्ता दहावीत प्रथम आलेले विद्यार्थी प्रदीप शिवतरे, अमित चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
विक्रमसिंह जाधव, प्रणाल जाधव, प्रणाली पारखी, चंद्रकांत घाडगे यांनी पुढाकार घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना एकत्र केले होते. कार्यक्रमादरम्यान शालेय जीवनातील अनेक आठवणी संगत शिक्षकांनी केलेली शिक्षा तसेच गमतीदार किस्से माजी विद्यार्थ्यांनी सांगितल्यावर वर्गात हशा पिकला. यावेळी शीतल जाधव, योगेश गाडे, साजिद शेख, रूपाली जाधव, ॲड. मृणाल जाधव, सुषमा राऊत यांनी मनोगते व्यक्त केले. यावेळी संजय धुमाळ, राजेंद्र वाघोले देवानंद घोगरे, सुनंदा महाले, मारुती बांदल, विश्वास भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

स्नेहमेळाव्याच्या यशस्वीतेसाठी युवराज धुराजी दुधाळ, साजिद शेख, राहुल वेदपाठक, चंद्रकांत घाडगे, बापू शेडगे यांनी परिश्रम घेतले. नंदिनी दुधाळ सूत्रसंचालन यांनी तर प्रा.संदीप कदम स्वागत केले. विक्रमसिंह जाधव यांनी आभार मानले.

63297

Web Title: Todays Latest District Marathi News Prn22b00815 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top