वीरची बससेवा बंद होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीरची बससेवा बंद होणार
वीरची बससेवा बंद होणार

वीरची बससेवा बंद होणार

sakal_logo
By

परिंचे, ता. १९ : हडपसर ते श्री क्षेत्र वीर (ता.पुरंदर) ही पीएमपीएमएलची बस सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे. यामुळे परिसरातील प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. श्री नाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्टने ही सेवा सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.

एसटी कामगारांच्या संप कालावधीत परिसरातील प्रवाशांचे अतोनात हाल झाले. खासगी प्रवासी वाहतूकदारांनी या काळात जास्त पैसे घेऊन प्रवाशांची लूट केली. अशा बिकट परिस्थितीत पीएमपीएमएलची हडपसर ते वीर बससेवा सुरु झाली. बस सेवेमुळे श्री क्षेत्र वीर येथे येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढला होता. परिंचे , हरगुडे, पांगारे परिसरातील विद्यार्थी ,ग्रामस्थ व कंपनी कामगारांची या बससेवेमुळे सुविधा झाली होती. अनेक कंपनी कामगारांनी दुचाकीवरून प्रवास करणे बंद करून सुरक्षित बस प्रवासाचा मार्ग निवडला होता.
बस सेवा सुरु करण्यासाठी वीर देवस्थान बरोबर वीर, परिंचे, सटलवाडी, हरगुडे, पांगारे, पिंपळे या ग्रामपंचायतींनी ठराव दिले होते. आता हडपसर- वीर ही बससेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आल्याने त्याला वीर,परिंचे परिसरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. ही सेवा अखंडित सुरू ठेवण्यासाठी परिंचे परिसरातील सर्व ग्रामपंचायतींचे विनंती ठराव पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे देणार असल्याचे परिंचे गावाच्या सरपंच ऋतुजा जाधव यांनी सांगितले. प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. माहूर, हरणी, परिंचे परिसरातील विद्यार्थी या बस सेवेचा लाभ घेत असून आसन व्यवस्था चांगली असून प्रवास करणे सुरक्षित वाटत असल्याचे शिवानी जाधव हिने सांगितले.

वीर येथील बस सेवा अखंडित सुरू राहण्यासाठी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुणे महानगर परिवहनच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले. यावेळी विश्वस्त सचिव अभिजित धुमाळ, विश्वस्त खजिनदार अमोल धुमाळ, प्रसाद गुरव उपस्थित होते.

एसटी महामंडळाचा आक्षेप

पुणे महानगर परिवहनचे व्यवस्थापक राजेश रूपनवर यांनी सांगितले की, एसटी महामंडळाने त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या बससेवेवर हरकत घेतल्यामुळे ग्रामीण भागातील बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सेवा सुरू ठेवण्यासाठी परिवहन महामंडळाचा ना हरकत दाखला द्यावा लागेल. मगच बससेवा सुरु ठेवण्याचा विचार केला जाईल.

Web Title: Todays Latest District Marathi News Prn22b00822 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top