
परिंच्यात कडबा कुट्टी मशिनचे वाटप
परिंचे, ता.१३ : येथील (ता.पुरंदर) श्री भैरवनाथ सहकारी दूध व्यवसाय संस्थेच्या वतीने २० शेतकऱ्यांना अनुदानित तत्त्वावर कडबा कुट्टी मशिनचे वाटप करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष अजय जाधव यांच्या हस्ते हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी जाधव म्हणाले की, शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने संस्थेने पंचवीस टक्के अनुदानित तत्त्वावर कडबा कुट्टी मशिन, गोचीड निर्मुलन औषध, ज्वारी व मका बियाण्यांचे वाटप, मुरघास बॅगचे वाटप केले आहे.
यावेळी संस्थेचे संचालक बाळासाहेब जाधव, श्रीकांत जाधव, धनसिंग जाधव, सचिव सचिन जाधव, प्रवीण जाधव, चंद्रकांत जगताप, बाळासाहेब ताकवले आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक गवळ्याला प्रती लिटरप्रमाणे एक रुपया लाभांश वाटप करण्यात येत असून पारदर्शक कारभारासाठी लॅक्टोस्कॅन मशिन ठेवली आहे. दररोज पाचशे लिटर दूध संकलन होत असल्याचे संस्थेचे सचिव सचिन जाधव यांनी सांगितले.
...
01659
Web Title: Todays Latest District Marathi News Prn22b00833 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..