यादववाडी येथील शाळेत ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यादववाडी येथील शाळेत 
‘साहित्यिक आपल्या भेटीला’
यादववाडी येथील शाळेत ‘साहित्यिक आपल्या भेटीला’

यादववाडी येथील शाळेत ‘साहित्यिक आपल्या भेटीला’

sakal_logo
By

परिंचे, ता. २३ : वाचन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे,त्यामुळे मुलांनी दररोज नवीन अवांतर पुस्तके वाचावीत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार यांनी यादववाडी (ता. पुरंदर) येथील माध्यमिक विद्यालयात केले. ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत त्यांनी मुले व शिक्षकांशी संवाद साधला.
आपण चांगले ऐकले तर चांगले बोलू शकतो, चांगले बोलले तर चांगले लिहू शकतो, आत्ताची पिढी बुद्धिमान आहे, त्या मुलांपुढे आपण चांगले विचार ठेवू शकलो तर निश्चित भावी पिढीत चांगले साहित्यिक निर्माण होतील, असे प्रतिपादन ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांनी केले. त्यांच्या हस्ते विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त शिक्षक भरत सुरसे, गणेश देवकर आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक वसंत ताकवले यांनी करून दिला. तर मुख्याध्यापक दिलीप नेवसे यांनी मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले. या कार्यक्रमास मंगेश बोरकर, हनुमंत निगडे, दीपक भोसले, राजेंद्र शिरसाठ, अशोक बाणे, आबोली भोंगळे इत्यादी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest District Marathi News Prn22b00858 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..