श्रीनाथ म्हस्कोबाच्या दर्शनासाठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीनाथ म्हस्कोबाच्या दर्शनासाठी गर्दी
श्रीनाथ म्हस्कोबाच्या दर्शनासाठी गर्दी

श्रीनाथ म्हस्कोबाच्या दर्शनासाठी गर्दी

sakal_logo
By

परिंचे, ता.२८ : श्री क्षेत्र वीर (या.पुरंदर) येथे आषाढी अमावास्येनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्यांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन केल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले आहे.
अमावस्येनिमित्त पहाटे ४.३० वाजता देवाची पहाट पूजा झाल्यावर दीप अमावस्येनिमित्त दीप पूजन करून मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी ६ वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी १० वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या. देऊळवाड्यातील दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता. दुपारी देवाची धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद केला व नंतर दुपारी सव्वा एक वाजता गाभारा पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला.

दर्शनासाठी आलेल्या शेकडो भाविकांना गणपतराव धुमाळ, रामदादा धुमाळ, सुशीलकुमार जाधव यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. देवस्थान ट्रस्ट मार्फत भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, लाइट व जनरेटर, दर्शनबारी, तीन ठिकाणी वाहनतळ व्यवस्था, परिसर स्वच्छता, जादा कर्मचारी, स्वयंसेवक, ट्रॅफिक पोलिस आदी व्यवस्था पुरवण्यात आली असल्याचे देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सचिव अभिजित धुमाळ यांनी सांगितले यावेळी ट्रस्टचे खजिनदार अमोल धुमाळ उपस्थित होते. अमावस्या उत्सव पार पाडण्यासाठी देवस्थानचे ट्रस्टचे उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ, विश्वस्त हनुमंत धुमाळ, नामदेव जाधव, संजय कापरे, रामचंद्र कुरपड, शिवाजी कदम आदी विश्वस्त मंडळ व मानकरी उपस्थित होते.
...
01713

Web Title: Todays Latest District Marathi News Prn22b00860 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top