परिंचेत कर्मवीर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा कलाविष्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिंचेत कर्मवीर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा कलाविष्कार
परिंचेत कर्मवीर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा कलाविष्कार

परिंचेत कर्मवीर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा कलाविष्कार

sakal_logo
By

परिंचे, ता. २२ : परिंचे (ता.पुरंदर) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांची१३५ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सजविलेल्या रथातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली. कर्मवीरांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावे मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
सकाळी विद्यालयाच्या प्रांगणात स्कूल कमिटीच्या सदस्या शैला जाधव, पी.एस.जाधव यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी नवले, रवींद्र जाधव, उपसरपंच दत्तात्रय राऊत, स्वाती राऊत मुख्याध्यापक महेश गोरेगावकर उपस्थित होते.
नाथ मंदिराच्या सभागृहात मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लोक गीताला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. अन्सार शेख, स्वरा गुळुंबे व मेघराज पिलाणे यांनी कर्मवीरांच्या जीवनावर नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी दुधाळ, दत्तात्रय बनकर, आभार राजेंद्र वाघोले यांनी केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रीतम शिंदे, विश्वास भोसले, योगिनी शेवते, संजिवनी वाघोले, रश्मी गुजर, शंतनू पवार, तुकाराम जाधव, किरण शेटे, प्रतिभा वळकुंदे, संजय धुमाळ, देवानंद धोंडगे, संदीप कदम यांनी परिश्रम घेतले.
PRN22B01760

Web Title: Todays Latest District Marathi News Prn22b00883 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..