शरद पवार उद्या करणार परिंचे, काळदरीची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवार उद्या करणार परिंचे, काळदरीची पाहणी
शरद पवार उद्या करणार परिंचे, काळदरीची पाहणी

शरद पवार उद्या करणार परिंचे, काळदरीची पाहणी

sakal_logo
By

परिंचे, ता.२२: पुरंदरमध्ये झालेल्या अतिवृष्टी बरोबरच शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार सोमवारी (ता.२४) रोजी परिंचे (ता.पुरंदर) येथे येणार असल्याची माहिती पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
शरद पवार हे पुरंदरमधील काळदरी, परिंचे, वीर परिसराची पाहणी करून शेतकरी, महिला व युवकांशी संवाद साधणार असल्याचे माणिकराव झेंडे यांनी सांगितले. महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांचे कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.
पुरंदरमध्ये पिकांबरोबरच शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अशा परिस्थिती शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. केंद्र व राज्य सरकारला हक्काने सांगणारी महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती म्हणजे पवार असल्याने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा असल्याचे डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.
यावेळी दुर्गाडे, राष्ट्रवादीचे नेते सुदाम इंगळे, हेमंतकुमार माहुरकर, तालुका युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव उपस्थित होते.दक्षिण पुरंदर मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीची पाहणी करण्यासाठी शरद पवार येणार असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आधार आला असल्याचे मत हेमंतकुमार माहूरकर यांनी व्यक्त करून या दौऱ्यात जास्तीत जास्त शेतकरी व महिलांनी उपस्थित राहून आपली व्यथा मांडण्याचे आव्हान केले आहे. यावेळी निखिल घाडगे, तेजपाल सणस, संदेश पवार, अनिल दुधाळ, नंदकुमार जाधव, उल्हास जाधव, बाळासाहेब मुळीक, पप्पू मोरे, दत्तात्रेय भोंगळे उपस्थित होते.