शासनाच्या योजनांद्वारे महिलांना सक्षम करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासनाच्या योजनांद्वारे महिलांना सक्षम करणार
शासनाच्या योजनांद्वारे महिलांना सक्षम करणार

शासनाच्या योजनांद्वारे महिलांना सक्षम करणार

sakal_logo
By

परिंचे, ता.३१ : ''''शासनाच्या विविध योजनांच्या माधमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून तळागाळातील लाभार्थ्यांना योजनांचा थेट लाभ मिळत आहे,'''' असे मत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केले

परिंचे (ता.पुरंदर) ग्रामपंचायतीच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी संदेश चौधरी यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमाने रंगत आणली. विविध गमतीदार खेळ व स्पर्धांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

चित्रा वाघ यांनी महिलांना योग्य संधी मिळाल्यास त्या गुणवत्ता दाखवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही सर्वांनी परिंचे गावाच्या सरपंच ऋतुजा जाधव यांना ग्राम विकास करण्याची संधी दिल्यामुळे ऋतुजा यांची गुणवत्ता संपूर्ण परिसराला समजली असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून परिंचे परिसरात केलेल्या विविध विकासकामांची माहिती डॉ. ममता शिवतारे यांनी दिली.


डॉ. ममता शिवतारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, दिलीप यादव, अर्चना जाधव, सांगलीच्या नगरसेविका स्वाती शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मानाची पैठणी- सुवर्णा पोळ,अर्चना जाधव व प्राजक्ता घाटे यांना सोन्याची नथ, कीर्ती वाघोले व सीमा वाघोले यांना चांदीचा छल्ला, सुप्रिया जाधव व आश्विनी वाघोले यांना डिनर सेट, वैशाली वाघोले व शुभांगी जाधव यांनी इस्त्री आदी बक्षिसे पटकावली. सरपंच ऋतुजा जाधव, उपसरपंच गणेश पारख, ग्राम पंचायत सदस्य पुष्पलता नाईकनवरे, अर्चना राऊत, प्रवीण जाधव, अजित नवले, समीर जाधव, सोपान राऊत, अजित जाधव, वैशाली शेडगे, मनीषा जाधव, सुप्रभा जाधव, कमलेश बहिरवाल, कोमल काळभोर, मैनाताई जाधव, संदीप नवले यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम करण्यात आला. संदेश चौधरी यांनी होम मिनिस्टरचे संचालन केले. सरपंच ऋतुजा जाधव यांनी सूत्रसंचालन तर माजी सभापती अर्चना जाधव यांनी आभार मानले.
...

01867