सीताफळ बहार व्यवस्थापनाचे पांगारे येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण

सीताफळ बहार व्यवस्थापनाचे पांगारे येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण

परिंचे, ता.१८ : पांगारे (ता.पुरंदर) येथील शेतकऱ्यांना छाटणी आणि बहार व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. अखिल भारतीय समन्वित अंजीर सीताफळ संशोधन केंद्र, जाधववाडी आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.
यावेळी शेतकऱ्यांना डॉ. प्रदीप दळवे यांनी प्रत्यक्ष सीताफळ बागेत छाटणी करून बहार व्यवस्थापनावर तर डॉ. युवराज बालगुडे यांनी रोग कीड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमानंतर महादेव विष्णू शेलार यांच्या सीताफळ बागेला भेट देऊन जुन्या सीताफळ बागांचे पुनरुज्जीवन याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रस्तावना कृषी पर्यवेक्षक संदीप कदम यांनी केली तर कृषी सहायक स्वप्नाली चौंडकर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमास सचिन शेलार, दत्तात्रेय शेलार, महादेव शेलार, दत्तात्रेय पिसाळ, सतपाल शेलार, प्रवीण शेलार, रामराव शेलार, गोपाळ शेलार, जितेंद्र शेलार, सोमनाथ निगडे, छबन काकडे, धोंडिबा शेलार, कांतिलाल कोंडे, मनीषा शेलार, वैशाली शेलार, तेजश्री शेलार, सुभद्रा शेलार, तानुबाई पिसाळ, कांताबाई शेलार आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...................
01948

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com