काळदरीत बियाणे बीज प्रक्रियेचे प्रशिक्षण

काळदरीत बियाणे बीज प्रक्रियेचे प्रशिक्षण

परिंचे, ता.२७ : काळदरी (ता.पुरंदर) येथील शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच योग्य मार्गदर्शन करण्याकरिता कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामात बियाणे पेरण्या पूर्वी बियाणे उगवण क्षमता तपासणी तसेच बियाणे बीज प्रक्रिया कशी करायची याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आला होते. यावेळी कृषी पर्यवेक्षक संदीप कदम यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन केले.

कृषी सहायक स्वप्नाली चौंडकर यांनी खरीप हंगामात बियाणे पेरणीपूर्वी बियाणांची उगवण क्षमता तपासणी तसेच बियाणांवर बीज प्रक्रिया का करावी याबद्दल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. त्यामुळे उत्पादनात होणारी वाढ, कीड रोग यांच्या प्रादुर्भाव पासून पिकांचे होणारे नुकसान कसे टाळता येऊ शकते खताच्या वापरामध्ये कशाप्रकारे बचत करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.
काळदरीचे माजी सरपंच अंकुश परखंडे यांनी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना सामूहिक तसेच सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन केले. तसेच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमासाठी माणिक शेलार, राजेंद्र जगताप, दत्तोबा शेलार, रावसाहेब करकर, नरहर देव, काशिनाथ शेलार, भगवान पिसाळ, अंकुश थोपटे, गोविंद जगताप गोरख मोरे, हरिभाऊ थोपटे, श्‍यामराव कोंढाळकर, दामोदर चिकाने आदी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...
01954

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com