
पौड बसस्थानकात प्रवाशांचा शुकशुकाट
पौड, ता. ३० : मुळशी तालुक्यात कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्याच गाड्या सुरू झाल्या आहेत. पीएमपीएलच्या बस विविध गावांत जात असल्याने त्या भागातील एसटी बंद आहेत. त्यामुळे पौड बसस्थानकात अद्यापही प्रवाशांचा शुकशुकाट पहायला मिळतो.
पौड येथील आगारात स्वच्छता कर्मचारी नसल्याने येथील वाहतूक नियंत्रक सुरेश मेंहेदळे यांना एसटीच्या नोंदीबरोबरच परिसर स्वच्छ करण्याची वेळ आली आहे. परिवर्तन विकास संस्थेच्या माध्यमातून याठिकाणी सशुल्क स्वच्छतागृह बांधले आहेत. परंतु प्रवाशी मंडळी त्याचा उपयोग न करता उघड्यावर लघुशंका करतात. बसस्थानकाच्या एसटी उभी राहण्याचे प्रांगण सध्या खासगी गाड्यांचे बेकायदेशीत वाहनतळ झाले आहे. याबाबत वाहतूक नियंत्रक सुरेश मेंहेदळे यांनी पौड पोलिस ठाण्यात तक्रार अर्जही दिला आहे. बसस्थानकाच्या रंगरंगोटीचीही गरज आहे. धरण भागात एसटीसेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी माजी सभापती कोमल वाशिवले यांनी निवेदनाद्वारे स्वारगेट आगारप्रमुखांकडे केली आहे.
तालुक्यात सध्या स्वारगेटहून रोहा, श्रीवर्धन, माणगाव, व्हिनेरा, महाड, दिवेआगार या गाड्या सुरू आहेत. त्याचप्रमाणे शिर्डी - मंडगनगड, बीड - मंडनगड, खेड - दापोली, खेड - आंबेजोगाई या लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू आहेत. तर कोळवणमार्गे मावळ तालुक्यात तळेगावला जाणारी गाडी सुरू झाली आहे. तर गुरुवारपासून (२८ एप्रिल) पोमगावला एसटी वाहतूक सुरू झाली आहे.
मात्र पीएमपीएलच्या फेऱ्यांमुळे बेलावडे, धुमाळवाडी (मांदे़डे), भादस, कुंभेरी, बार्पे, वांद्रे, भांबर्डे, भादस तसेच मावळकडे जाणाऱ्या जवण, शिळीम या गाड्या अद्याप बंद आहेत. एकंदर पौड बसस्थानकात दिवसात पंधऱा गाड्या ये जा करतात.
तालुक्यात लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्या आहेत. हळूहळू धरण भागातील गाड्याही सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. विद्यार्थी आणि कामगार पास देणेही सुरू आहे. एसटी वाहतूकीच्या वेळापत्रकाबाबत प्रवाशांनी काहीही शंका असल्यास चौकशीसाठी ७४९८००८५७३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
- सुरेश मेंहेदळे, वाहतूक नियंत्रक
पौड (ता.मुळशी) : केवळ लांब पल्ल्याच्याच गाड्या सुरू झाल्याने बसस्थानकात असलेला प्रवाशांचा शुकशुकाट.
०१२६२
Web Title: Todays Latest District Marathi News Pud22b00886 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..