मुळशीतील पर्यायी रस्त्याचे मजबुतीकरण करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळशीतील पर्यायी रस्त्याचे मजबुतीकरण करण्याची मागणी
मुळशीतील पर्यायी रस्त्याचे मजबुतीकरण करण्याची मागणी

मुळशीतील पर्यायी रस्त्याचे मजबुतीकरण करण्याची मागणी

sakal_logo
By

पौड, ता. ७ ः मुळशी तालुक्यातील पौड, दारवली, अंबडवेट, भरेमार्गे, लवळे या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण करावे, अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हासंपर्क संघटिका स्वाती ढमाले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
पौडपासून चांदणी चौकाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे. सूस, म्हाळुंगे, नांदे, चांद्याकडून पौडला येणाऱ्या ग्रामस्थांच्या सोयीसाठी लवळे ते भरेमार्गे अंबडवेट, दारवली गावाहून पौडला येण्या जाण्याचा पर्यायी मार्ग आहे. त्यात लवळे गावातून भरे गावाकडे जाण्यासाठी कच्चा रस्ताही आहे. काही वाहतूकदार या रस्त्यानेही ये जा करतात. हा रस्ता झाल्यास महामार्गावरील ताणही कमी होवू शकतो. तसेच वेळ आणि इंधनाचीही बचत होवू शकते. लवळे ते भरे या मार्गावरील रस्ता नादुरुस्त आहे. ठिकठिकाणी त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी पुरेसा निधी मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी राहुल दुधाळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अमोल मोकाशी, शिवसेना उपतालुका प्रमुख कालिदास शेडगे उपस्थित होते. दरम्यान, या मागण्यांबाबत मंत्री शिंदे यांनी अनुकूलता दर्शविल्याचे स्वाती ढमाले यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Pud22b00896 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top