
अमराळे यांनी अनेक माणसे जोडली
पौड, ता. १० : ''''सुभाष अमराळे यांनी राजकारणात सातत्याने संयमी आणि त्यागी प्रवृत्ती तसेच समन्वयाची भूमिका ठेवली. त्यामुळे सर्व पक्षांतील वरीष्ठांबरोबरच सर्वसामान्य मुळशीकरांशीही त्यांची नाळ अखेरपर्यंत जुळली. आपल्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली,'''' असे प्रतिपादन उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांनी अमराळेवाडी (ता.मुळशी) येथे केले.
माजी जिल्हा परिषद सदस्य (कै.) सुभाष अमराळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अमराळेवाडी येथे बांधलेल्या स्वागत कमानीचे लोकार्पण करण्यात आले. त्याचप्रमाणे तालुक्यातील सहा गुणवतांचा सुभाषभाऊ अमराळे स्मृती पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. त्यावेळी पवार बोलत होते. सुभाष अमराळे प्रतिष्ठान आणि अंबडवेट ग्रामस्थांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, रामचंद्र ठोंबरे, आत्माराम कलाटे, रणजित शिवतरे, शंकर मांडेकर, बाळासाहेब चांदेरे, बाळासाहेब बोडके, शांताराम इंगवले, महादेव कोंढरे, रवींद्र कंधारे, दगडूकाका करंजावणे, नानासाहेब शिंदे, अनिल तुपे, दिलीप वेडेपाटील, गंगाराम मातेरे, मयूरशेठ कलाटे, दिलीप उंबरकर, नवनाथ जाधव, बाळासाहेब अमराळे, राम गायकवाड, लक्ष्मीताई सातपुते, कोमल वाशिवले, दीपाली कोकरे त्याचप्रमाणे विविध पक्षांचे मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, अनिल महाराज पाटील बार्शीकर यांचे कीर्तन आणि भागवताचार्य चंद्रकांत महाराज वांजळे यांचे प्रवचन झाले.
यावेळी राष्ट्रपती पदक विजेते काशिनाथ उभे, वेदवेदांत गुरुकुलाचे वेदांताचार्य मंदार महाराज येनपुरे, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे प्रमुख कृष्णा भिलारे, चार्टड अकाऊंटटची परीक्षा उत्तीर्ण झालेली सायली गोरड, जलतरणपटू गीता मालुसरे, गुणवंत विद्यार्थी स्वाती पाटील यांना सुभाषभाऊ अमराळे स्मृती पुरस्कार देऊन गौरविले. राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष सचिन अमराळे यांनी प्रास्ताविक तर विलास अमराळे यांनी आभार मानले.
01289
Web Title: Todays Latest District Marathi News Pud22b00903 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..