मुळशीतील ‘महसूल’ची कामे वळेवर होत नसल्याची तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळशीतील ‘महसूल’ची कामे
वळेवर होत नसल्याची तक्रार
मुळशीतील ‘महसूल’ची कामे वळेवर होत नसल्याची तक्रार

मुळशीतील ‘महसूल’ची कामे वळेवर होत नसल्याची तक्रार

sakal_logo
By

पौड, ता. १४ : मुळशी तालुक्यात तहसील कार्यालयात शेतकऱ्यांच्या महसूलाची कामे वेळेवर होत नाही. विविध कामांसाठी पैशांची मागणी होत असते. यावर आळा बसावा, अशी मागणी करीत रिपब्लिकन पक्षाच्यावतीने विविध गावांतील महसूली समस्यांचे निवेदन प्रांत अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार अभय चव्हाण व पौड पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांना दिले.
याबाबत निवेदन देताना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत कदम, तालुकाध्यक्ष गोविंद निकाळजे, महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड अध्यक्ष डॉ. सतीश केदारी, महिला अध्यक्षा नंदाताई जाधव, तालुका एम्प्लॉई फेडरेशन अध्यक्ष शशिकांत चव्हाण, युवक अध्यक्ष विजय भोसले, रिपब्लिकन ब्रिगेड अध्यक्ष के. के. लगड, सचिव विजय भालेराव, संघटक नीलेश आल्हाट आणि पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी महसुल अधिनियम १५५ अन्वये दाखल केलेल्या अर्ज प्रकरणांवर जलदगतीने आदेश व्हावेत, रेशनिंगकार्डचा निपटारा जलदगतीने करावा, जातीच्या दाखल्यांच्या अर्जाची तपासणी करण्यास विलंब होवू नये, दस्त नोंदणीचे थम्स घेण्यासाठी संबंधित टेबलच्या अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी करू नये, याकरिता कडक कारवाई करावी. अंबडवेट, नांदगाव, कुळे या गावांत अनुसूचित जातीच्या लोकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत न्याय द्यावा, अशा विविध मागण्या केल्या.
या मागण्या मार्गी लावण्यासाठी सकारात्मकतेने प्रयत्न करू, असे आश्वासन तहसीलदार चव्हाण यांनी शिष्टमंडळाला दिले.

Web Title: Todays Latest District Marathi News Pud22b00908 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top