जिल्हातील ४१० मिळणार शाळांत भौतिक सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हातील ४१० मिळणार शाळांत भौतिक सुविधा
जिल्हातील ४१० मिळणार शाळांत भौतिक सुविधा

जिल्हातील ४१० मिळणार शाळांत भौतिक सुविधा

sakal_logo
By

पौड, ता.१५ : ''''शाळा सुधार कार्यक्रमामुळे प्राथमिक शाळांमध्ये भौतिक सुविधा मिळतील. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारून शाळांचा दर्जा आणि पटसंख्या वाढण्यास मदत होईल. जिल्ह्यातील ४१० प्राथमिक शाळांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे,'''' अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी पौड (ता.मुळशी) येथे दिली.
जिल्हा परिषदेच्यावतीने १५० पेक्षा जास्त पट असलेल्या शाळा आणि वंचित केंद्रातील ६० पेक्षा जास्त पट असलेल्या प्राथमिक शाळांमध्ये शाळा सुधार कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याबाबत मुळशी आणि मावळमधील मुख्याध्यापकांसाठी घेतलेल्या कार्यशाळेत गायकवाड बोलत होत्या. यावेळी प्रभारी उपशिक्षणाधिकारी मुकुंद देडगे, गटविकास अधिकारी संदीप जठार, मुळशीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रताप सुतार, विस्तार अधिकारी चंद्रकांत उगले, मावळचे विस्तार अधिकारी सुदाम वाळूंज, कार्यकारी अभियंता जितेंद्र मेमाणे, उपअभियंता बाळासाहेब सायंबर, विस्ताराधिकारी त्र्यंबक ताम्हाणे, शाखा अभियंता संदीप शिवदे तसेच मुळशीतील १९ आणि मावळमधील ५३ शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.


शाळा सुधार कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतींनी १४ व्या व १५ वित्त आयोगातील शिल्लक निधीचा वापर करावा, असे जठार यांनी सांगितले. शिक्षण विभागामार्फत शिष्यवृत्ती सराव चाचणी उपक्रम हाती घेण्यात आला असून येत्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून या सराव चाचणी नियमित चालू ठेवण्यात येतील असे सुतार यांनी सांगितले.
यावेळी देंडगे, उगले, वाळुंज यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन केंद्रप्रमुख मधुकर येनपुरे यांनी केले.


शाळा सुधार कार्यक्रमांतर्गत मुख्याध्यापक नेतृत्व गुण विकास प्रशिक्षण कार्यशाळा, शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण, शालेय सुशोभीकरण ही उद्दिष्टेसमोर ठेवून त्रयस्थ संस्थेमार्फत शाळांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. याची अंमलबजावणी जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येईल. वर्गखोल्या बांधकामविषयक व इतर साधन सामग्री विकास सर्वेक्षण करण्यासाठी तालुकास्तरीय सर्वेक्षण समिती गठित करण्यात येणार आहे. १७ ते २३ मे या कालावधीत शैक्षणिक गुणवत्ता सुधार कार्यक्रमाबाबत मुख्याध्यापकांचे जिल्हास्तरावर सादरीकरण घेण्यात येणार आहे.
-संध्या गायकवाड, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद


01300

Web Title: Todays Latest District Marathi News Pud22b00909 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top