सुळे यांनी लावले विधवा महिलेस कुंकू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुळे यांनी लावले विधवा महिलेस कुंकू
सुळे यांनी लावले विधवा महिलेस कुंकू

सुळे यांनी लावले विधवा महिलेस कुंकू

sakal_logo
By

पौड, ता. १ : पतीचे निधन झाल्यानंतर सौभाग्याच्या खुणा पुसून टाकण्याची परंपरा मोडीत काढत एकल महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी धडपडणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पौड (ता.मुळशी) येथे विधवा महिलेला कुंकू लावले. दिव्यांनी औक्षण करून त्यांचा नुकताच सन्मान केला.
पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या दिवशीच सुळे यांनी एकल महिलेला सन्मानाची वागणूक द्या, असे आवाहन करीत मुळशी तालुक्यातील विधवा प्रथेला मूठमाती देण्याचा प्रारंभ केला. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड (ता.शिरोड) ग्रामपंचायतीने एकल महिलेला सन्मानाची वागणूक देण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानंतर राज्यातील इतर ग्रामपंचायतींनीही आपल्या गावात हेरवाड पॅटर्न राबविण्यास सुरूवात केली.
यावेळी माजी सभापती राधिका कोंढरे, कोमल वाशिवले, जिल्हा परिषद सदस्या अंजली कांबळे, पुजा बुट्टे, निर्मला जागडे, दीपाली कोकरे, उज्वला मारणे, रूपाली ढोकळे आदि महिला तसेच माजी आमदार शरद ढमाले यांच्यासह विविध पक्षांचे मान्यवर उपस्थित होते. सुळे यांच्या या उपक्रमाचे मुळशीकरांनी स्वागत केले.

महिलांना सन्मानाची वागणूक देण्याचे आवाहन
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शंभर टक्के कर्जवसुली करणाऱ्या विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी सुप्रिया सुळे पौडला पंचायत समितीच्या सभागृहात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी विधवा महिलेस कुंकू लावले. चांदीची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला. मुळशी तालुक्यातील आजपासून तिलांजली देवून एकल महिलांना सन्मानाची वागणूक देण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

01342

Web Title: Todays Latest District Marathi News Pud22b00932 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top