मुळशीच्या कातकरी बांधवांना विठू माऊलीची ओढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळशीच्या कातकरी बांधवांना विठू माऊलीची ओढ
मुळशीच्या कातकरी बांधवांना विठू माऊलीची ओढ

मुळशीच्या कातकरी बांधवांना विठू माऊलीची ओढ

sakal_logo
By

पौड, ता. ८ : मुळशी तालुक्यात वारकरी सांप्रदायाचा पाया रचणारे आदिवासी दिंडीचे संस्थापक सहदेवमहाराज कंधारे यांनी गेली बत्तीस वर्षापासून सुरू केलेली आदिवासी वारकरी दिंडीचे यावर्षी शनिवारी (९ जुलै) चांदणी चौकातून प्रस्थान होणार आहे. या दिंडीमुळे कातकरी बांधवांनाही विठू-माऊलींच्या दर्शनाची ओढ लागली आहे.

सहदेवमहाराज कंधारे यांचा जन्म तालुक्यातील कोंढवळे या गावी झाला. त्यांनी तालुक्यातील ग्रामस्थांना वारकरी सांप्रदायाकडे वळविले. तालुक्यातील अनेकांना भक्तीमार्ग दाखविला, एवढेच नव्हे तर मुळशी, माण, रायगड भागातील आदिवासी मंडळींनाही पंढरीच्या विठूरायाचे दर्शन व्हावे म्हणून आदिवासी दिंडी सोहळा मुळशी वारकरी संस्था सुरू केली. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी वाहनाद्वारे जाऊन पहीला मुक्काम निरा-नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे केला जातो. त्यानंतर दिंडी एकादशीच्या दिवशी पंढरपूर मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी थेऊर, आळंदी देवदर्शन घेवून ही दिंडी पुन्हा घराकडे परतते.
कंधारे महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यगणांनी दिंडीचा उपक्रम सुरू ठेवला. त्यांचे शिष्य नथू मिरकुटे, विठ्ठल वायकर, शिवाजी हुलावळे, शशिकांत हुलावळे, महादू पिंगळे, प्रभाकर कंधारे, सिताराम चव्हाण, प्रभाकर ढगे, गणपत भोईणे, बंडू दातीर, सोमाजीबुवा कंधारे, बळीराममहाराज पारखी, संगीता वाल्हेकर, आक्काताई लांडगे, नामदेव पिंगळे असे अनेक शिष्यगण हा आदिवासी दिंडीचा रथ पुढे ढकलत आहे.

या शिष्यांनी पंढरपूर येथे बारा गुंठे जागा विकत घेतली असून, त्याठिकाणी मुळशी, कोथरूड येथील दानशूरांच्या मदतीमुळे धर्मशाळा बांधली आहे. धर्मशाळेच्यापुढे असलेल्या मोकळ्या जागेत शेडचे बांधकाम करावयाचे असून त्यासाठी आर्थिक सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे. शनिवारी (९ जुलै) चांदणी चौकातून दिंडीचे सकाळी दहा वाजता प्रस्थान होणार आहे. दरवर्षी प्रस्थान सोहळ्यासाठी तालुक्यातील राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतात.
----------------------

Web Title: Todays Latest District Marathi News Pud22b00992 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..