ज्येष्ठ, दिव्यांगांवर पेन्शन बंदची नामुष्की | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ, दिव्यांगांवर पेन्शन बंदची नामुष्की
ज्येष्ठ, दिव्यांगांवर पेन्शन बंदची नामुष्की

ज्येष्ठ, दिव्यांगांवर पेन्शन बंदची नामुष्की

sakal_logo
By

पौड, ता. ९ : मुळशी तालुक्यातील निराधार, ज्येष्ठ, गरीब, दृष्टिहीन, दिव्यांग व्यक्तींना सरकारच्यावतीने विशेष साहाय्य योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. तथापि महसूल प्रशासनाच्या दिरंगाईमुळे काही लाभार्थ्यांना उत्पन्नाचे आणि हयातीचे दाखले ३० जूनपर्यंत देता आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर पेन्शन बंद होण्याची नामुष्की ओढावली. याबाबत युवासेना आक्रमक झाली असून त्यांनी तहसीलदारांची भेट घेत दाखल्यांसाठी मुदतवाढ द्यावी, तसेच मंडलनिहाय शिबिरे घेऊन गरजूंना गावातच दाखले द्यावेत, अशी मागणी केली.
विविध योजनेअंतर्गत तालुक्यातील सुमारे तीन हजार दोनशे निराधार, परित्यक्ता आदी व्यक्तींना पेन्शन दिली जाते. या पेन्शनमधूनच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. दरवर्षी या लाभार्थ्यांना एक एप्रिल ते तीस जूनपर्यंत उत्पन्नाचा आणि हयातीचा दाखला द्यावा लागतो. याबाबत महसूल प्रशासनाकडून एक एप्रिलपूर्वीच जनजागृती करणे आवश्यक होती. परंतु, तहसीलदार अभय चव्हाण यांनी २० जूनला दाखल्याचे पत्र काढल्याने लाभार्थी आणि महसूल कर्मचारी यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. दहा दिवसांत ज्येष्ठ, निराधारांना दाखले जमा करणे अशक्य झाले. त्यामुळे काहींची पेन्शन बंद झाली. याबाबत तालुक्यातील युवासेना पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव अविनाश बलकवडे, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा अधिकारी राम गवारे आणि दत्ता झोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने लाभार्थ्यांसह तहसीलदार अभय चव्हाण यांची भेट घेत दाखल्याबाबत मुदतवाढ मिळावी, त्याचप्रमाणे मंडलनिहाय शिबिरे घेऊन लाभार्थ्यांना त्यांच्या गावातच दाखले देण्यात यावेत, अशी मागणी केली. यावेळी शिवसहकार सेनेचे तालुका संघटक ज्ञानेश्वर डफळ, माजी तालुकाप्रमुख रविकांत धुमाळ, शिवसेना युवा नेते अमोल शिंदे, उपतालुका समन्वयक विष्णू ढोरे, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सावंत, महिला आघाडीच्या सल्लागार सोनाली बोंन्द्रे, उपतालुका संघटिका सुमन जोरी, बाळासाहेब नरवडे, प्रसिद्धी प्रमुख संतोष टेमघरे, पंकज धिडे, मारुती धनवे, मयूर रानवडे, यश पिंगळे आदि शिवसैनिक तथा युवासैनिक उपस्थित


लाभार्थ्यांना उत्पन्नाचा आणि हयातीचा दाखला देण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मंडलनिहाय शिबिरे घेऊन लाभार्थ्यांना दोन्ही दाखले गावातच दिले जाणार आहे. या दाखल्यांबाबत महसूल कर्मचाऱ्यांकडून जनजागरणही केले जात आहे.
-अरुण कदम, नायब तहसीलदार, मुळशी

Web Title: Todays Latest District Marathi News Pud22b00995 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top