आंदेशे, मांदेडे गावांचा संपर्क तुटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंदेशे, मांदेडे गावांचा संपर्क तुटला
आंदेशे, मांदेडे गावांचा संपर्क तुटला

आंदेशे, मांदेडे गावांचा संपर्क तुटला

sakal_logo
By

पौड, ता. १२ : गेली चार दिवसांपासून सतत पडत असलेल्या संततधार पावसामुळे आंदेशे आणि मांदेडे (ता. मुळशी) या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे या दोन्ही गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.
कोंढवळे, आंदेशेगावच्या सीमारेषेवरून ओढा वाहतो. तो मुळा नदीला जाऊन मिळतो. या गावांना जाण्यासाठी आंदेशे गावाच्या अलीकडे पूल बांधला आहे. या पुलाची उंची कमी असून तो जीर्णही झालेला आहे. गेली चार दिवस तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील ओढे नाले तुडूंब भरले आहेत.
आंदेशेचा ओढाही दुथडी भरून वाहू लागल्याने मंगळवारी (ता. १२ ) दुपारी येथील ओढ्यावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे आंदेशे, मांदेडे या दोन्ही गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला. परिणामी आंदेशे, मांदेड्याहून पौड, पिरंगुट, पुण्याकडे येणारे विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक तसेच शेतकरी वर्ग दोन्ही बाजूला अडकून पडले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या भागातील युवक पुलावरून पाणी वाहत असल्याची माहिती पोचवत आहे.

01469

Web Title: Todays Latest District Marathi News Pud22b01003 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..