
सायकल रॅली, स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
पौड, ता. १३ ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने शनिवारी (२३ जुलै) शनिवारवाडा ते हडपसरपर्यंत विविध सामाजिक संदेश देणारी सायकल रॅली काढली जाणार आहे. त्याचप्रमाणे पुणे ते बारामती ही राष्ट्रीय पातळीवरील सायकल स्पर्धा होणार आहे. स्पर्धा व रॅलीत सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी केले.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रॅली आणि स्पर्धा होणार आहे. रॅलीत लोकप्रतिनीधी, शासकीय अधिकारी, कलाकार, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती, विद्यार्थी, शिक्षक आणि पर्यावरणप्रेमी असे सुमारे तीन हजार सायकलप्रेमी सहभागी होणार आहेत. सायकलींग फेडरेशन ऑफ इंडीया आणि महाराष्ट्र सायकलींग असोसिएशनच्या सहकार्याने संस्थेने घेतलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह तेरा राज्यातील सुमारे पाचशेच्यावर राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय सायकलपटू सहभागी होणार आहेत. तरी रॅली आणि स्पर्धेमध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्या सायकलप्रेमींनी डॉ. योगेश पवार (९८५०९५२७८७), संस्था कार्यालय (०२०-२५४३४५७०), येथे संपर्क साधून नाव नोंदवावे. तसेच https://forms.gle/JbtTXDhoWVUJB९dJ८ या लिंकवरूनही गुगल फॉर्म भरावा, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Pud22b01004 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..