केंद्राकडून न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याला धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्राकडून न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याला धक्का
केंद्राकडून न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याला धक्का

केंद्राकडून न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याला धक्का

sakal_logo
By

पौड, ता. ३० : ''''लोकशाही घटनेचे पावित्र्य जपायचे असेल तर भाजपमध्ये सामील झालेले आणि भाजपमधील भ्रष्ट माणसांकडेही ईडीने लक्ष दिले पाहिजे. न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याला धक्का देत त्याचे पावित्र्यही पायदळी तुडविण्याचे काम केंद्रातील सत्ताधारी करीत आहेत. सरकारने निर्माण केलेली क्रूर परंपरा लोकशाहीच्या वर्तमानाला हानिकारक आहे,'''' असा घणाघात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केला.

विरोधी पक्ष नेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्यावतीने घेतलेल्या अनंत व्याख्यानमालेत भारताचे संविधान आणि आजचे वर्तमान याविषयावर सबनीस बोलत होते. ते पुढे म्हणाले, की संवेदनशील सरकार, समाज ही देशाची पहिली गरज आहे. परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, असंघटित कामगारांचे प्रश्न वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळत नाही. बालकामगारांचा प्रश्न संपलेला नाही. आदिवासी, दलित, शेतकरी मागे का राहिला याचे आत्मचिंतन केले पाहिजे. घटनेचे मारेकरी आपण असेल तर तिरंग्याला सलाम करण्याचा जयहिंद म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव (प्रशासन) ए.एम.जाधव, साहित्यिक वि. दा. पिंगळे, विठ्ठल गायकवाड उपस्थित होते.

अमृता खराडे यांनी सूत्रसंचालन तर सेवक कल्याण निधीचे अध्यक्ष हडपसर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी आभार मानले.


राज्यपाल हे संविधानिक पद आहे. या पदाच्या माणसाने एखाद्या पक्षाची अलिखित पाटी लावावी आणि एकाच पक्षाच्या बाजूने सर्व निर्णय द्यावे, हे संविधानाचे पावित्र्य नाही. केंद्रसरकार निःपक्षपाती भूमिका घेत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही. लोकशाहीची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणे हे राज्यकर्त्याचे काम आहे. माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याची जबाबदारी सरकारची आहे. नवा भारत घडविण्यासाठी शिक्षकांनी विधायक योगदान दिले पाहिजे.
- डॉ. श्रीपाल सबनीस, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

01496

Web Title: Todays Latest District Marathi News Pud22b01019 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top