
मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मेळाव्याचे आयोजन
पौड, ता. ५ : विश्वकर्मा सेवा फाउंडेशनच्यावतीने मुळशी तालुक्यातील शेतकरी, युवक आणि महिलांसाठी रविवारी (ता. १४) सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. माले येथील सेनापती बापट विद्यालयात होणाऱ्या या कार्यशाळेत मुळशीकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र आचार्य यांनी केले आहे. तालुक्यातील युवकाचे शहरात नोकरी, व्यवसायाच्या शोधात होणारे स्थलांतर थांबावे. गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा कार्यशाळेचा उद्देश आहे. कार्यशाळेत सेंद्रिय शेती, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन, कृषीपर्यटन या विषयांवर राज्यातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सांगली जिल्ह्यात दहा वर्षांपासून सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वीपणे राबविणारे अरविंद सोमण, कृषी पर्यटनाच्या क्षेत्रात राजुरी येथे उल्लेखनीय काम करणारे मनोज हाडवळे, जलजिविका या स्वयंसेवी संस्थेमार्फत महाराष्ट्रात गेली दहा वर्षे मत्स्यपालनाच्या क्षेत्रात कार्यरत असणारे निळकंठ मिश्रा, मधुमक्षिकापालनाच्या क्षेत्रात काम करणारे अमित गोडसे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेचे उद्घाटन माजी आमदार शरद ढमाले, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रामभाऊ ठोंबरे यांच्या हस्ते होईल.
Web Title: Todays Latest District Marathi News Pud22b01029 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..