''संपर्क''चे कातकरी समाजाच्या विकासात योगदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''संपर्क''चे कातकरी समाजाच्या विकासात योगदान
''संपर्क''चे कातकरी समाजाच्या विकासात योगदान

''संपर्क''चे कातकरी समाजाच्या विकासात योगदान

sakal_logo
By

पौड, ता. ११ : ''''मुळशी तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी इतर पुढारलेल्या घटकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. संपर्क ग्रामीण संस्था या समाजासाठी अनेकविध उपक्रम राबवीत आहेत. त्यामुळे कातकरी समाजातील पिढ्या शिक्षण, व्यवसायाकडे वळू लागले आहेत. आदिवासी समाजाच्या विकासात या संस्थेचे योगदान मोलाचे आहे,'''' असे गौरवोद्गार तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी काढले.
कळमशेत (ता.मुळशी) येथे जागतिक आदिवासी दिनानिमीत्त संपर्क संस्थेच्यावतीने तालुक्यातील ५५ प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील आदिवासी कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी संपर्कचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, मुख्य कार्यकारी अधिकारी व इकलेर्स कंपनीचे सदस्य अनुजकुमार सिंग, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर केंद्रप्रमुख मधुकर येनपुरे, संपर्क शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय चाळक, आदिवासी संघाचे अध्यक्ष शंकर बत्ताले, संस्थेचे प्रकल्प समन्वयक कल्पेश रोकडे, स्वप्नील करणे, रतन यादव, निखिल पवार, परमेश्वर गजले, कपिल स्वामी, संदीप कोळी, संदीप भांगरे उपस्थित होते.
दरम्यान, शाळेत घेतलेल्या निबंध, वक्तृत्व आणि नृत्य स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

८२० विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग सुककर
आदिवासी दिनानिमित्त संपर्कच्यावतीने तालुक्यातील भांबर्डे, आंबवणे, कोळवण, मुठा, मोसे खोऱ्यातील प्राथमिक आणि माध्यमिक ५५ शाळांतील आदिवासी कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तालुक्यातील ८२० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्याने त्यांचा शिक्षणाचा मार्ग सुककर झाला. या संस्थेच्या मदतीमुळे रानावनात शिकारीसाठी भटकणारी किंवा हातभट्टीचा व्यवसाय करणारी अनेक कुटुंबे आता इतर व्यवसाय करून स्वावलंबी होवू लागली आहेत. त्यांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात येवू लागली आहेत.
आदिवासी कातकरी विद्यार्थ्यांना वर्षभर लागेल एवढे साहित्य संस्थेच्या माध्यमातून देण्यात येईल मागेल त्या कुटुंबांना संस्थेच्या माध्यमातून रोजगार दिला जाईल.
- कल्पेश रोकडे, प्रकल्प समन्वयक, संपर्क

01542

Web Title: Todays Latest District Marathi News Pud22b01042 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..