आठवडी बाजाराच्या सजात हजर रहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आठवडी बाजाराच्या सजात हजर रहा
आठवडी बाजाराच्या सजात हजर रहा

आठवडी बाजाराच्या सजात हजर रहा

sakal_logo
By

पौड, ता ८ : मुळशी तालुक्यातील तलाठी भाऊसाहेब बावधनला तलाठी प्रशिक्षण केंद्रात असल्याच्या नावाखाली नेमून दिलेल्या सजामध्ये दांडी मारत होते. त्यामुळे जमिनीची महसूली कागदपत्रे मिळविण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुस्कटदाबी होत होती. याबाबत शेतकरी तसेच विविध संघटनांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार अभय चव्हाण यांनी तलाठ्यांना सोमवार, मंगळवारसह आठवडी बाजाराच्या दिवशी सजात हजर राहण्याचे लेखी आदेश काढले आहेत.
महसूल विभागात काम करणारा तलाठी हा शेतकरी आणि सरकार यांच्यामधील दूवा समजला जातो. गावातील ग्रामस्थांच्या जमिनींच्या महसूली कागदपत्रांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचे काम तलाठी करतात. सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजना तळागाळात पोचविण्यासाठीही, नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी त्याची भूमिका महत्वाची असते. जमिनीचा सातबारा, फेरफार काढण्यासाठी त्यातील हस्तदोष तसेच अन्यायकारक नोंदीच्या दुरूस्तीसाठी तलाठ्याचे काम शेतकऱ्यांसाठी महत्वाचे ठरत असते. त्याचप्रमाणे सर्कल, तहसीलदार, प्रांत, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे चालू असलेल्या न्यायालयीन कामकाजाला आवश्यक असणारी कागदपत्रे मिळविण्यासाठी तलाठ्यांवर विसंबून रहावे लागते.
काही तलाठी मंडळीनी नेमून दिलेल्या सजाचे कार्यालय पौडला थाटले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आशेने पौडला येतात. त्याठिकाणी तलाठी नसल्यास शेतकऱ्यांची गैरसोय व्हायची. महसूली कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने निकाल एकतर्फी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे याबाबत शेतकऱ्यांनी, विविध राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी तहसीलदार अभय चव्हाण यांच्याकडे याबाबत लेखी, तोंडी तक्रारी केल्या. चव्हाण यांनी त्याची गंभीर दखल घेतली.

...अन्यथा कारवाई करण्यात येईल
आठवडी बाजार आणि दर आठवड्याच्या सोमवार, मंगळवारी तलाठ्यांनी सजात उपस्थित राहावे. तसेच फिरस्ती दौऱ्याच्या दिवशी दर्शनी भागात तशा प्रकारचे सूचनाफलक लावावे. सजातील दप्तर अद्ययावत ठेवावे. मुख्यालयी गैरहजर असल्यास तसेच फिरस्ती कार्यक्रम फलकानुसार संबंधित गावात उपस्थित नसल्यास कारवाई करण्यात येईल. असा लेखी आदेश तहसीलदार अभय चव्हाण यांनी तलाठ्यांना काढला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Pud22b01093 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..