जगाशी स्पर्धा करणारा सक्षम विद्यार्थी घडवावा ः बांदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगाशी स्पर्धा करणारा सक्षम विद्यार्थी घडवावा ः बांदल
जगाशी स्पर्धा करणारा सक्षम विद्यार्थी घडवावा ः बांदल

जगाशी स्पर्धा करणारा सक्षम विद्यार्थी घडवावा ः बांदल

sakal_logo
By

पौड, ता. १५ ः ‘विद्यार्थ्यांना शिकविणे ही शिक्षकाची एक कला आहे. कोरोनाच्या काळात सर्वत्र ऑनलाइन शिक्षणाचे वारे पसरले होते. त्यामुळे बदलत्या काळानुसार आता शिक्षक आता डिजिटल आर्टिस्टही झाला आहे. आता जगाशी स्पर्धा करणारा संस्कारित सक्षम विद्यार्थी शिक्षकांनी घडवावा,’ असे आवाहन चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक राजेंद्र बांदल यांनी पौड (ता. मुळशी) येथे केले.

खेचरे येथील अप्पासाहेब ढमाले माध्यामिक विद्यालयातील १९९८ च्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने गुणवंत शिक्षकांना सन्मानित करताना बांदल बोलत होते. यावेळी चिंचवडच्या वेदवेदांत गुरूकुलचे संस्थापक आचार्य मंदारस्वामी येनपुरे, सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, कोंढावळ्याचे माजी उपसरपंच लहू चव्हाण, मुळशी धरण शिक्षण मंडळाचे संचालक नामदेव जाधव, बाबाजी शेळके, तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष गणेश पारखी, विस्तार अधिकारी प्रताप सुतार, खेचरे विद्यालयाचे मुख्याध्यापक अंकुश बोऱ्हाडे, केंद्रप्रमुख मधूकर येनपुरे, वांद्रे ग्रामपंचायत सदस्य विशाल पडवळ, माजी विशेष दंडाधिकारी अनंता चौधरी, प्रदिप साठे, दीपक करंजावणे उपस्थित होते.

येनपुरे म्हणाले की, विद्यार्थी नुसता शिक्षित करून उपयोग नाही, तर सुशिक्षित, संस्कारित झाला पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे कौतुक करणे म्हणजेच शिक्षकाच्या ज्ञानकुंडाचा महायज्ञ सफल झाल्यासारखे आहे.

यावेळी अनिल कुचेकर (दोन्हेवाडी आडमाळ), शरीफ तांबोळी (वांद्रे), अंकुश खोडवे (ताम्हिणी), नीलेश गायकवाड (भांबर्डे), रेश्मा झावरे (आंबवणे), संदीप परकाळे (खेचरे), सुरेश बाम्हणे (माले आयटीआय), रुचिरा खानविलकर (पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल बावधन) या शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, तसेच गटविकास अधिकारी संदीप जठार आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी अशोक धुमाळ यांचाही विशेष सत्कार केला.

माजी विद्यार्थी पप्पू कंधारे, अशोक जोरी, सखाराम पवार, राजेंद्र शिळीमकर, दुर्वेश धुमाळ, रवींद्र दारवटकर, संदीप पारखी, सचिन मोहणे, केशव वीर, दीपक कंधारे, सानिया कंधारे, आरती धुमाळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सूत्रसंचालन मधूकर येनपुरे यांनी, तर आभार अशोक जोरी यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
------------------

Web Title: Todays Latest District Marathi News Pud22b01105 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..