दखणे येथे आज राष्ट्रवादीचा मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दखणे येथे आज राष्ट्रवादीचा मेळावा
दखणे येथे आज राष्ट्रवादीचा मेळावा

दखणे येथे आज राष्ट्रवादीचा मेळावा

sakal_logo
By

पौड, ता ९ : मुळशी तालुक्यातील पौड - कासारआंबोली जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवारी (१० ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता होणार आहे. दखणे (ता. मुळशी) येथील साई गणेश मंगल कार्यालयात होणाऱ्या या मेळाव्यास खासदार सुप्रिया सुळे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे यांनी दिली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी सुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सावरगाव येथील जयवंत दहिभाते यांच्या मॅंगो व्हिलेज या हॉटेलचे उद्घाटनही सुळे करणार आहेत.