सातबाऱ्यावरील नोंदी दुरुस्तीसाठी ''छावा''तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातबाऱ्यावरील नोंदी दुरुस्तीसाठी ''छावा''तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सातबाऱ्यावरील नोंदी दुरुस्तीसाठी ''छावा''तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातबाऱ्यावरील नोंदी दुरुस्तीसाठी ''छावा''तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

sakal_logo
By

पौड, ता. २३ : शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील चुकीच्या नोंदीच्या दुरुस्तीसाठी तालुका आणि गावनिहाय महाराजस्व अभियान राबविण्यात यावे, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू फाले यांनी केली. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची भेट घेऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत त्यांना निवेदन दिले.
फाले यांच्या समवेत यावेळी पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष संजय ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक साखरे, कोळवण विभाग अध्यक्ष राजेंद्र शेळके, विद्यार्थी अध्यक्ष प्रकाश साळवे उपस्थित होते. हस्तलिखित सातबारा उताऱ्याचे डिजीटलायझेशन करताना महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे काम करणारी खासगी संस्था यांच्याकडून अनेक चुका झालेल्या आहेत. ही चुक दुरुस्त करण्यासाठी शेतकरी तसेच जमीन खरेदी करणारी इतर लोकांना वेळ, पैसा याबरोबरच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तलाठ्यांना अर्ज करून मंडल अधिकाऱ्यांमार्फत चुक दुरुस्तीचे प्रकरण सोडविण्यात येते असे महसूल विभागाकडून सांगितले जाते. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. चुक दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना कलम १५५ अंतर्गत तहसीलदारांकडे अर्ज करावा लागतो. त्यासाठी जुनी कागदपत्रे जोडावी लागतात. तहसिल कचेरीच्या पायऱ्या अनेकवेळा चढाव्या लागतात. त्यात वेळ आणि पैशाचा वारेमाप खर्च होतो.
संघटनेच्या या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी देशमुख यांनी मुळशी तालुक्यात पंधरा दिवसांत महाराजस्व अभियान राबविण्यात यावे. त्याबाबतचे पत्रक काढण्याचे आदेश तहसीलदार अभय चव्हाण यांना दिले असल्याचे फाले यांनी सांगितले.