पौड येथे पालखी सोहळ्यात शेकडो भाविक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पौड येथे पालखी सोहळ्यात शेकडो भाविक
पौड येथे पालखी सोहळ्यात शेकडो भाविक

पौड येथे पालखी सोहळ्यात शेकडो भाविक

sakal_logo
By

पौड, ता. २४ : येथे (ता.मुळशी) श्री स्वामी समर्थ दिंडी प्रणितअंतर्गत ग्रामअभियान पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. स्वामी समर्थांचा जयघोष करीत काढलेल्या पालखी सोहळ्यात तालुक्यातील शेकडो भाविक सहभागी झाले होते.
पौड गावात बाजारपेठेतून स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. सरपंच अजय विजय कडू यांच्याहस्ते पालखीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी पालखीचे पूजन केले. यावेळी केंद्रप्रमुख सोनल हरसूले, अनंता जोशी, अशोक वरगुडे, सुरेश वाघ, गौरव जोशी, रवी काळोखे, संदीप म्होकर, सारिका जोशी, पूनम घाग,
सुनीता दरेकर, अभिलाषा इंगळे, मोनिका शिंदे, हेमा वाघ, बाळासाहेब क्षीरसागर आदींनी नियोजन केले होते.

01895