आज पिरंगुटला पीडीईए मुळशी कुस्ती स्पर्धा बाल आणि कुमार गटातील कुस्तीगिरांना भाग घेण्याचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज पिरंगुटला पीडीईए मुळशी कुस्ती स्पर्धा
बाल आणि कुमार गटातील कुस्तीगिरांना भाग घेण्याचे आवाहन
आज पिरंगुटला पीडीईए मुळशी कुस्ती स्पर्धा बाल आणि कुमार गटातील कुस्तीगिरांना भाग घेण्याचे आवाहन

आज पिरंगुटला पीडीईए मुळशी कुस्ती स्पर्धा बाल आणि कुमार गटातील कुस्तीगिरांना भाग घेण्याचे आवाहन

sakal_logo
By

पौड, ता. २२ ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मुळशी तालुक्यातील शाळांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी पीडीईए मुळशी शरद चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (२३ डिसेंबर) पिरंगुट विद्यालयात मुलांमुलींचा कुस्त्यांचा थरार पहावयास मिळणार आहे. तालुक्यातील बाल आणि कुमार गटातील कुस्तीगिरांनी त्यात भाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्य एस. वाय. शिंदे, एच. टी. चव्हाण आणि एस. व्ही. भोकरे यांनी केले आहे.
१४ वर्षाखालील मुलांच्या गटात २५, २८, ३२, ३५, ३८, ४०, ४२ किलो वजनगटात ही स्पर्धा होईल. तर, मुलींमध्ये ३०, ३६, ४२, ५०, ५८ किलो वजनगट आहे. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात ४५, ४८, ५१, ५५, ६०, ६५, ७१, ८०, ९२, ११० किलो तर, मुलींच्या गटात ४०, ४६, ५३, ५७, ६१, ६५ किलो वजनगटात कुस्त्या रंगतील. प्रत्येक वजनगटातील विजेत्या, उपविजेत्यास रोख रक्कम व चषक तर, सहभागी कुस्तीगीराला प्रमाणपत्र दिले जाईल. या वेळी दिव्यांग मुलांचीही कुस्ती लावली जाणार आहे. मुळशीकरांसाठी ही स्पर्धा असल्याने सहभागी कुस्तीगिरांना रहिवास आणि वयाचा पुरावा सोबत आणावा लागणार आहे. मुळशी तालुका कुस्तीगीर संघ, राष्ट्रवादीचे तालुक्यातील पदाधिकारी आणि पिरंगुट ग्रामस्थांच्या सहकार्याने या स्पर्धेचे नियोजन केले गेले आहे. तालुक्यातील कुस्ती प्रशिक्षण केंद्र, तालीम, शाळांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे. त्यासाठी प्रा. सागर तांगडे(९६२३४३२१५१), प्रवीण सातव (९९२२४१९०५४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याध्यापिका एस. जे. डोंगरे, रेश्मा गायकवाड, श्रीकांत मोहोळ यांनी केले आहे.