
गुडेल, सुदर्शन कंपनीकडून माले आयटीआयला मदत
पौड, ता. १८ : माले (ता. मुळशी) येथील मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस गुडेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दोन लाखाचे शैक्षणिक साहित्य दिले. तर, सुदर्शन केमिकल कंपनीने सात विद्यार्थ्यांचा वर्षभराच्या खर्चासाठी एक लाख रुपयांची मदत केली.
‘गुडेल’ कंपनीने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून २७ व्हीलचेअर आणि ९ टेबल, असे सुमारे २ लाखाचे साहित्य संस्थेस दिले. कंपनीच्या संचालिका नीता, प्रॉडक्शन व्यवस्थापक चिंतामणी पिंगळे
यांच्या सहकार्याने दिले. तर, अंबडवेट येथील सुदर्शन केमिकल कंपनीने आयटीआयमध्ये शिकणाऱ्या आदिवासी व वंचित घटकातील ७ विद्यार्थ्यांच्या वार्षिक शुल्काचा १ लाख
रुपयाचा धनादेश दिला. सुदर्शनच्या सीएसआर प्रमुख माधुरी सणस आणि व्यवस्थापिका वैशाली मुळे यांना हा धनादेश संस्थेस दिला. संस्था अध्यक्ष शरद ढमाले, संस्थापक रामचंद्र दातीर, सरचिटणीस रमेश जोरी व प्रभारी प्राचार्य सुरेश बाम्हणे यांनी या कंपन्यांचे आभार मानले.