मुळशी तालुक्यात शाळांच्या केंद्र समूहाची सुधारित संरचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळशी तालुक्यात शाळांच्या 
केंद्र समूहाची सुधारित संरचना
मुळशी तालुक्यात शाळांच्या केंद्र समूहाची सुधारित संरचना

मुळशी तालुक्यात शाळांच्या केंद्र समूहाची सुधारित संरचना

sakal_logo
By

पौड, ता. १४ : मुळशी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक त्याचप्रमाणे खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या केंद्र समूहाची सुधारित संरचना करण्यात आली आहे. तब्बल २८ वर्षानंतर झालेल्या नवीन संरचनेत फेरबदल करण्यात आले असून काही केंद्र समूहांची नावेही बदलण्यात आली आहेत.
तालुक्यात मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या एकूण २८५ शाळा आहेत. शैक्षणिक कामाच्या सोयीसाठी, नियंत्रणासाठी या शाळा वीस केंद्रांमध्ये विभागण्यात आल्या आहेत. १९९५मध्ये केंद्र समूह शाळांची संरचना करण्यात आली होती. वाढत्या शाळा, खासगी इंग्रजी शाळांचे पेव यामुळे पूर्व भागातील काही केंद्र प्रमुखांवर जास्त भार आला होता. त्यामुळे २८ वर्षानंतर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी शाळांच्या केंद्र समूह संरचनेत मोठे फेरबदल केले आहेत. या संरचनेत एकाच गावातील वाडींमध्ये असलेल्या शाळा दोन वेगळ्या केंद्रात समाविष्ट केल्या गेल्या आहेत. हिंजवडी केंद्रात तर जिल्हा परिषदेची एकच प्राथमिक शाळा समाविष्ट असून इतर सर्व खासगी शाळा आहेत. काही केंद्रांची पूर्वीची नावे बदलून त्यांना नवीन नावेही मिळाली आहेत.