पौड येथे जनसुरक्षा अभियानास प्रतिसाद
पौड, ता. १८ : जनसुरक्षा योजनेच्या परिपूर्ततेसाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या मुळशी तालुक्यातील शाखांच्यावतीने पौड येथे ग्रामपंचायत पातळीवर विशेष अभियान राबविण्यात आले. या वेळी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देऊन ग्रामस्थांमध्ये जागृती करण्यात आली.
युनियन बॅंक ऑफ इंडियाच्या पौड, मुठा, कोळवण आणि लवासा सिटीच्यावतीने पौडला हे अभियान झाले. या वेळी बॅंकेचे ग्रेटर पुण्याचे उपमहाव्यवस्थापक अभिषेक कुमार, सहसंचालक पंकज शर्मा, ग्रामीण व कृषी व्यवसाय विभाग प्रमुख प्रताप मुरकुटे, बँक ऑफ महाराष्ट्राचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, व्यवस्थापिका अपूर्वा जोगळेकर उपस्थित होत्या. युनियन बॅंकेचे पौडचे शाखाप्रमुख संदीप कुमार, सुमीत वाडकर (मुठा), श्रीकांत गोसावी (कोळवण), तुषार पराते (लवासा सिटी) यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेसाठी विविध लाभकारी योजना तयार करीत असते. त्याचा लाभ लोकांनी घेतला पाहिजे. १८-७० वयोगटातील कोणतीही व्यक्ती प्रतिवर्ष २० रुपये भरून प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजने अंतर्गत नोंदणी करू शकते. १८-५० वयोगटातील कोणताही ग्राहक पंतप्रधान जीवनज्योत बिमा योजना योजनेअंतर्गत वार्षिक ४३६ रक्कम भरून त्याचा लाभ घेवू शकतो. अशी माहिती अभिषेक कुमार यांनी दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.